भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करून जनतेला संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता काहीच दिवसांत लागू होणार आहे. याच दरम्यान गेल्या काही वर्षांपासून राज्यात चर्चेचा विषय राहिलेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीतील होणारा दसरा मेळावा यंदा देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
या वर्षीचा दसरा मेळावा हा ऐन विधानसभा निवडणुकीत येणार आहे. तसेच यंदा परळी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे तगडे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर असणार आहे.या बहुचर्चित बहिण भावामध्ये होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे,मंत्री पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ‘माधव’ फॅक्टरची पुर्नबांधणी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ह्या आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करत आपली ताकद पक्षश्रेष्ठींना दाखवून देत शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह बीड जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान,सोशल मिडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने लोकनेत्याच्या लेकीनं दिली आहे विकासाची साद ! चलो भगवानभक्तीगड, देऊ लाखोंचा आशिर्वाद !! चलो सावरगाव…!! अशी पोस्ट केली आहे. या पोस्टला मुंडे समर्थकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
मागच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात, भगवान बाबांचे भव्य समाथीस्थळ बांधत पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांनी केले होते. या मेळाव्यास राज्याभरातील बडे नेते मंडळी, मंत्री, आमदार तसेच बहुजन समाजातून लाखो लोकं उपस्थित राहिली. यामुळे,मागील दसरा मेळाव्याची चर्चा राज्यासह देशभरात झाली होती.